सूर्यग्रहणात गर्भवती महिलांनी घ्यावी विशेष काळजी; या गोष्टी चुकूनही करू नयेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला अशुभ मानले जाते. त्यामुळे या काळात गर्भवती महिलांची सर्वाधिक काळजी घेतली जाते. तसेच त्यांना ग्रहण संपेपर्यंत काही नियम देखील पाळण्यास सांगितले जातात. यावर्षीचे सूर्यग्रहण शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी याकाळात स्वतःची आणि आपल्या बाळाची अधिक काळजी घ्यावी. तसेच पुढे दिलेल्या या गोष्टी करण्यापासून टाळाव्यात.

ग्रहणात या गोष्टी करू नयेत..

1) सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याची किरणे हानिकारक ठरतात. त्यामुळे या काळात गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये. जेणेकरून त्या किरणांचा माता आणि मुलांवर वाईट होईल.

2) सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी ब्लेड कात्री सुया अशा धारदार वस्तूंचा वापर करू नये.

3) सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवतीने काहीही खाणे पिणे टाळावे. (गरज भासल्यास औषध, पाणी, दूध, फळे इ. गोष्टी घ्याव्यात.)

4) सूर्यग्रहणात सुतक काळ सुरू झाल्यानंतर गर्भवती झोपून राहू नये. तसेच कोणतेही जड काम करू नये.

5) ग्रहणाच्या कालावधीमध्ये गर्भवती महिलेने भाजी चिरणे चिरणे कपडे धुणे, भांडी घासणे ही कामे करू नये.

6) तसेच गर्भवती महिलेने सूर्यग्रहण पाहण्यास देखील बाहेर पडू नये.

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र या काळात सूर्याची किरणे जास्त तीव्र आणि घातक असल्यामुळे त्या किरणांमुळे गर्भवती महिलांना हानी पोहोचू शकते. तसेच त्याचा पोटात वाढणाऱ्या बाळावर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या कालावधीमध्ये गर्भवती महिलेने स्वतःची विशेष काळजी घ्यावी. तसेच आपल्या बाळाला देखील जपावे.