समीरसिंह साळवे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर; नक्षलवादाविरुद्ध लढ्यात सक्रिय योगदानाबद्दल गौरव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । नक्षलवादाला नेस्तनाबूत करण्यासाठी अग्रभागी असणाऱ्या C-60 कमांडो पथकाचे माजी प्रमुख समीरसिंह साळवे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत गडचिरोलीमधील अबुजमाड जंगलात नक्षलवादाचा प्रतिबंध केला. अनेक नक्षलींना प्रत्यर्पण करायला लावून यातील बहुतांश जणांना जगण्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम समीरसिंह साळवे यांनी केलं आहे. साळवे यांच्या नेतृत्वातील C-60 टीमने सर्वाधिक ६५ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.

या अतुलनीय पराक्रमाबद्दल समीरसिंह साळवे यांना शनिवारी राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झालं आहे. साताऱ्यातील लोणंद गावचे सुपुत्र असणारे साळवे सध्या नाशिकमधील मनमाड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. १० वी पर्यंत लोणंदमधील मालोजीराजे विद्यालयात शिक्षण घेतलेल्या समीरसिंह यांनी महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज तर अभियांत्रिकीची पदवी एमआयटी कॉलेजमधून घेतली आहे. २३ व्या वर्षी राज्यसेवेतून डीवायएसपी झाल्यानंतर त्यांचं पहिलंच पोस्टिंग गडचिरोली येथे झाली. त्यानंतर सोलापूर येथे त्यांनी सेवा बजावली आणि पुन्हा गडचिरोली येथे इच्छा बदली मागून घेतली.

राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या राज्यातील १० पोलिसांमध्ये साळवे यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे या पदकांची घोषणा करण्यात आली आहे. साळवे यांच्याव्यतिरिक्त मिठू जगदाळे, सुरपत वड्डे, आशिष हलामी, वसंत आत्राम, अविनाश कांबळे, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, डॉ.एम.व्ही.सी महेश्वर रेड्डी यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झालं आहे. साळवे यांना जाहीर झालेल्या शौर्य पुरस्काराबद्दल पोलीस दलासोबत विविध सामाजिक स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

हे पण वाचा-

आदर्शग्राम हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

“प्रजासत्ताक: काल, आज आणि उद्या”

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ जाहीर

Leave a Comment