कोरोनावर उपचार घेतल्याचे भासवून साडेचार लाख लाटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोविड लसीची बनावट प्रमाणपत्रे बनविणे, एकाच्या जागी दुसराच कोरोना रुग्ण उभा करणे, असे प्रकार समोर आले होते. त्यात आता तब्बल नऊ जणांनी कोरोनाची लागण झाली नसतानाही, रुग्णालयात दाखल न होताच उपचार घेतल्याचे दाखवत कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीला लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

हा प्रकार जून 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड हेल्थ सेंटरमध्ये घडला. याप्रकरणी नऊ जणांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. विमा कंपनीकडे संशयितांनी विमा क्लेम दाखल केला होता. मात्र, यामध्ये उपचार न घेताही उपचार घेतल्याचे बनावट कागदपत्रांद्वारे दाखवत विमा क्लेम दाखल करण्यात आल्याची हातचलाखी कंपनीच्या मुंबईतील जोखीम नियंत्रण व तोटा कमी करणे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आली होती.

या प्रकरणात आरोपींमध्ये असित जगदीश वाघ (31, रा . जयभीमनगर, टाऊनहॉल), अमोल हनुमंतराव रानसिंग (38, रा. नागेश्वरवाडी), शिवानी शिरीष मुळे (26, रा. एन -11 हडको), शुभांगी भरतसिंग राजपूत (23, रा. नारळी बाग), किशनमल लक्ष्मणलालजी गुर्जर (33, रा. आदर्शनगर, रांजणगाव शेणपुंजी), गणेश काकासाहेब कडू (23, रा. गिरीराज कॉलनी, पंढरपूर), इंदल भाऊसिंग राजपूत (40, रा. 53 गिरीराज हॉसिंग सोसायटी), इम्रान शेख मुश्ताक (30, रा. खोपडपुरा), प्रवीण प्रभाकर पवार (28, रा. सातारा परिसर) यांचा समावेश आहे.

Leave a Comment