आपल्या Aadhar Card मधील माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card : सध्याच्या काळात आधार कार्ड महत्वाच्या कागद्पत्रांपैकी एक बनले आहे. याशिवाय अनेक सरकारी सुविधांचा लाभ मिळणार नाही. जवळपास प्रत्येक कामासाठी ते आवश्यकच आहे. मात्र, आजकाल आधारमधील फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर आधारमधील डेटाच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 27 मे रोजी UIDAI कडून याबाबत एक प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आले होतो. यामध्ये नागरिकांना आपल्या आधार कार्डची फोटोकॉपी कोणत्याही संस्थेला देऊ नये असे सांगण्यात आले होते.

UIDAI ने म्हंटले आहे की, आधार युझर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आधार डेटाच्या सुरक्षिततेसाठी मजबूत व्यवस्था करण्यात आली आहे. चला तर मग आपले आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे ते जाणून घेउयात. Aadhar Card

UIDAI suspends these services related to Aadhaar Card: Check details | Latest News India - Hindustan Times

टू फॅक्‍टर ऑथेंटिकेशन

Aadhar Card चा गैरवापर टाळण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आधारशी लिंक करणे. असे केल्याने आधारच्या व्हेरिफिकेशनसाठी OTP देणे असेल, हा OTP आधारशी लिंक केलेल्या मोबाइल क्रमांकावरच येईल. OTP शिवाय आधारचे व्हेरिफिकेशन करता येणार नाही. त्यामुळे आपल्या आधारचा गैरवापर टाळण्यासाठी मोबाईल नंबर नेहमी आधारशी लिंक करा. जर मोबाईल नंबर बदलला असेल तर नवीन मोबाईल नंबर आधारशी अपडेट करा.

मास्‍क्‍ड आधार कॉपी

जर कुठेही Aadhar Card ची फोटोकॉपी द्यायची असेल तर मास्‍क्‍ड आधार कार्डची फोटोकॉपी द्या. मास्‍क्‍ड आधार मध्ये पूर्ण आधार क्रमांकाऐवजी फक्त शेवटचे चारच अंक दिले जातात. ज्यामुळे कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून मास्‍क्‍ड आधार डाउनलोड करता येईल.

What is Masked Aadhaar?: आधार कार्ड देते समय रहें सावधान, हो सकता है फ्रॉड,

बायोमेट्रिक्स लॉक वापरा

बायोमेट्रिक्स लॉक करणे म्हणजे तुमचा अंगठा, बोटे आणि बुबुळाचे ठसे यांचा वापर करून केलेले लॉक. आपल्याला हे बायोमेट्रिक्स लॉक वापरूनही आधार सुरक्षित करता येईल. आपल्याला UIDAI च्या वेबसाइटवरूनही बायोमेट्रिक्स लॉक करता येईल. बायोमेट्रिक्स लॉक केल्यानंतरही OTP बेस्ड ऑथेंटिकेशन सुरूच राहील. आपल्याला तात्पुरते किंवा कायमचे बायोमेट्रिक्स लॉक देखील करता येईल.

व्हर्च्युअल आयडेंटिटी वापरा

व्हर्च्युअल आयडेंटिटी (VID) मध्ये आधार नंबर लपविला जातो आणि तात्पुरता 16 अंकी व्हर्च्युअल आयडी तयार केला जातो. यामध्ये युझर्सच्या आधार क्रमांकाचा उल्लेख नसला तरी त्याची ओळख प्रमाणित केली जाते. VID फक्त काही काळासाठीच व्हॉइस असते. नवीन व्हर्च्युअल आयडेंटिटी तयार केल्यावर, जुना आपोआप क्लीअर होतो. आधार पोर्टल किंवा एम-आधारच्या मदतीने व्हर्च्युअल आयडेंटिटी तयार केली जाऊ शकते. Aadhar Card

Aadhaar Card Update: Change address in Aadhaar in few simple steps, here's how | Personal Finance News | Zee News

अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/

हे पण वाचा :

Interest Rates : आता ‘या’ फायनान्स कंपनीकडून आपल्या FD वरील व्याजदरात वाढ !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचे नवीन दर पहा

आता घरबसल्या PAN Card वरील फोटो कसा बदलावा हे समजून घ्या !!!

Share Market : गेले तीन दिवस बाजारामध्ये तेजी का आली ??? तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या

Zomato Share : गेल्या पाच दिवसात ‘या’ शेअर्सने घेतली 26% उडी !!! तज्ज्ञांचे काय मत आहे ते पहा