आता बुट-चप्पल अन् कार यांच्या किंमती वाढल्या, ATM मधून पैसे काढण्याच्या नियमातही बदल..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आधीच महागाईने उच्चांक गाठला असतानाच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून चप्पल-बुटांची खरेदी, नवे वाहन यांच्यात दरवाढ झाली आहे. एवढंच नव्हे तर एटीएम मधून पैसे काढणे देखील महागल आहे. कोणत्या वस्तु साधारण किती टक्क्यांनी महाग झाल्या आहेत? तसेच कोणत्या वस्तुंवरील कर सरकारने किती रुपयांनी वाढवला आहे याबाबत आज आपण जाणुन घेणार आहोत.

एटीएम मधून पैसे काढणे महागणार

देशातील ग्राहकांना एटीएममधून व्यवहार करणे आता महाग झाले आहे. आरबीआयने एटीएममधून मोफत व्यवहार केल्यानंतर पैसे काढण्यावर शुल्क वाढवण्यास मंजुरी दिली होती. एटीएममधून महिन्याला फक्त 5 मोफत व्यवहार होतील, मेट्रो शहरातील इतर बँकांच्या एटीएममधून 3 मोफत व्यवहार करता येतील. त्यानंतर जे अतिरिक्त व्यवहार होतील त्या प्रति व्यवहारासाठी 1 जानेवारी 2022 पासून 20 च्या ऐवजी 21 रुपये चार्ज द्यावा लागेल

चप्पल आणि बुटांच्या खरेदीसाठी मोजावे लागणार अधिक पैसे

बूट आणि चप्पलवर आता ५ टक्क्यांऐवजी १२ टक्के जीएसटी लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता चप्पल आणि बुटांच्या खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत

कार खरेदी करणं पडणार महागात

नवीन वर्षात कार खरेदी करणे देखील ग्राहकांना महागात पडणार आहे. देशातील अनेक वाहन कंपन्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या कारच्या किमती वाढवणार आहेत. 1 जानेवारी 2022 पासून मारुती सुझुकी, फोक्सवॅगन आणि व्होल्वोची वाहने महाग झाली आहेत. टाटा मोटर्सने 1 जानेवारी 2022 पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5% ने वाढवल्या आहेत. टोयोटा आणि होंडाही त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार आहेत.

Leave a Comment