महिलेने पुजाऱ्याला दिला चपलेचा प्रसाद; व्हिडिओ व्हायरल झाल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमधील एका मंदिरातील पुजाऱ्याला महिलेने चप्पलेने मारहाण केली आहे. यानंतर या महिलेने या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पुजाऱ्याने विष पिऊन आत्महत्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हि घटना राजस्थानच्या अलवारमधील कटीघाटी या ठिकाणची आहे. या घटनेनंतर पीडित पुजारी पंडित प्रकाश यांचा मुलगा योगेशने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण
प्रेम प्रकाश दिक्षितसह एक महिला आणि काही लोक मंदिर हडपण्याचा डाव आखत होते. याच कारणामुळे महिलेने पुजाऱ्याला मारहाण करत त्याचा व्हिडिओ वायरल केला आहे. ही महिला गुरुवारी तीन-चार लोकांसोबत कटीघाटी मंदिरात पोहोचली. यानंतर महिलेने पुजारी पंडित प्रकाश यांच्यावर दारू पिऊन छेडछाड केल्याचा आरोप केला आणि त्यांना चपलेने मारहाण केली. यावेळी तिकडे अनेक लोक उपस्थित होते. त्यांच्यापैकी कोणीतरी हि महिला मारहाण करतानाच व्हिडिओ शूट केला व सोशल मीडियावर व्हायरल केला.

यादरम्यान महिलेसोबत आलेल्या एका व्यक्तीने पुजाऱ्याकडे पैशांची मागणी करत त्यांना धमकीदेखील दिली. यामुळे मंदिराच्या परिसरात बराच गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती पुजाऱ्याला मिळताच त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

You might also like