पंतप्रधान मोदींनी जगाला शिकवण देण्याआधी स्वतः अंमलात आणावी : चिदंबरम यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांकडून अनेकवेळा टीका केली जात आहे. मोदी यांनी नुकत्याच ‘G -७’ या देशांच्या परिषदेतील  एका सत्रात भाषण केल्याने त्याबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. “पंतप्रधान मोदींनी जगाला शिकवण देण्याआधी स्वतः अंमलात आणावी,” असे चिदंबरम यांनी ट्विट करीत म्हंटले आहे.

चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, “G-7 समूहाच्या परिषदेत लोकशाही आणि वैचारिक स्वातंत्र्यावर भर देण्याबद्दल मोदींचे भाषण प्रेरणादायक होते तसेच विचित्र होते. मोदी सरकारने जगाला दिलेली शिकवण आधी स्वत: अंमलात आणावी,” चिदंबरम यांनी अशा शब्दात मोदी यांच्या भाषणावर परखड मत व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच G-7 समूहाच्या परिषदेत दूरसंवादाच्या माध्यमातून सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात त्यांनी ‘G-7’ देशांच्या परिषदेतील ‘ओपन सोसायटीज अ‍ॅण्ड ओपन इकॉनॉमिज’ या सत्रात दहशतवाद, अधिकारवाद आणि आर्थिक जुलूम या विरोधात भारत ‘G-७’ राष्ट्रांचा एक नैसर्गिक सहकारी आहे, असे म्हंटले होते. मोदी यांनी केलेल्या या भाषणावरून काँग्रेसचे जेष्ठ नेते चिदंबरम यांनी टीका केली आहे.

Leave a Comment