आता कोरोनाच्या नव्या घातक विषाणूचे संकट, मोदींनी बोलवली तातडीची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा काय परिणाम होतो हे सर्व जगणे अनुभवलं आहे. आता कुठे त्यातून सावरतो ना सावरतो दक्षिण आफ्रिकेत नवा कोरोना विषाणू आढळलल्याने जगापुढे आता नवे संकट उभे राहिले आहे. यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुले निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात आता भारत देशातील राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही आरोग्य मंत्र्यालयाने केल्या आहेत. भारताने कोणती काळजी घ्यावी आणि उपाययोजना करावी, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीच्या बैठकी बोलवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतळी जाणार आहे. या बैठकीत ते कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि कोरोना लसीकरणाचा आढावा घेणार असून या बैठकीस सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात देखील चर्चा केली जाणार आहे. यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुळं निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात भारताने कोणती काळजी घ्यावी आणि उपाययोजना करावी, यासंदर्भात सखोल स्वरूपात चरचा केली जाणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत यूरोपात झालेला कोरोनाचा विस्फोट आणि तेथील काही देशांना पुन्हा करावे लागणार? तसेच पुन्हा लॉकडाऊन लावावा लागणार का? यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी भारतात कोविशील्ड, कोवॅक्सिन, रशियाची स्पुतनिक वी या लसींना परवानगी देण्यात आली आहे. शिवाय भारताने शंभर कोटींच्या लसीकरणाचा टप्पा यापूर्वीच पूर्ण केला आहे.

Leave a Comment