पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना लस टोचून घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनामुक्त करुयात, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.

मी एम्समध्ये जाऊन कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या देशाचे वैज्ञानिक आणि डॉक्टर्स ज्या वेगाने काम करत आहेत, ते प्रशंसनीय आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनामुक्त करुयात, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बॉयोटेक कंपनीची कोव्हॅक्सिनचा (covaxin) पहिला डोस घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील एम्समध्ये कार्यरत असणाऱ्या पडुचेरी येथील सिस्टर पी. निवेडा यांनी नरेंद्र मोदींना कोरोना लसीचा डोस दिला. कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. भारतात कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like