पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार जनतेशी संवाद

दिल्ली प्रतिनिधी ।  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करतील. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून दिली आहे. त्यात पंतप्रधानांनी लिहिले की, “आज संध्याकाळी सहा वाजता देशातील नागरिकांशी संवाद साधेल. आपण सर्वांनी सहभागी व्हावे.”

मात्र पंतप्रधानांनी आजच्या संवादात काय असेल हे निर्दिष्ट केलेले नसले, तरी ते देशातील कोरोना व्हायरस परिस्थितीबद्दल बोलतील अशी शक्यता आहे.

सुरवातीच्या संपूर्ण टाळेबंदीत मोदी हे नागरिकांशी अनेक वेळा बोलले आहेत. मात्र गेल्या तीन/चार महिन्यापासून टप्याटप्याने टाळेबंदी शिथिल केल्यापासून जनतेशी वार्तालाप केल्या नसल्याने आज कदाचित नवीन नियमावली वा कोरोना परिस्थिती याबाबत बोलण्याची शक्यता असेल.