आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा मलकापूर नगरपालिकेच्यावतीने सत्कार

कराड | माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड विमानतळच्या आसपास असणाऱ्या मलकापूर व कराड शहरातील बांधकामास विमानतळ विकास प्राधिकरणाने परवानगी दिल्याने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार मलकापूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा निलम येडगे, उपगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक राजेंद्र यादव (आबा), गणेश चव्हाण, नगरसेविका आनंदी शिंदे, शंकूतला शिंगण, भारती पाटील, नगरसेवक प्रशांत चांदे, नारायण रैनाक, प्रदीप भोसले, शहाजी पाटील,समीर तुपे, मोहनराव शिंगाड आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण कडून कराड विमानतळ च्या 20 किमी परिघामध्ये बांधकामावर बंधने लादल्याने गेली चार महिने चालू बांधकामे परवानगी विना बंद पडली होती. या सर्व परिस्थिती ची तसेच कराड विमानतळ च्या आसपासच्या भागाची वस्तुस्थिती आ. चव्हाण यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया व भारतीय विमानतळ प्राधिकरण चे अध्यक्ष संजीव कुमार यांच्यासमोर मांडली. यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण कडून एक कलर कोडेड झोनिंग मॅप तयार करण्यात आला. त्यालाही परवानगी केंद्रीय पातळीवरून लवकर होण्यासाठी आ. चव्हाण यांनी प्रयत्न केले. या सर्व बाबी लक्षात घेता कराड व मलकापूर परिसरातील नागरिकांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. व यासाठी सर्व स्तरातून आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे अभिनंदन होत आहे.