विठ्ठलवाडीत पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय; विरोधकांना भोपळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथे पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व 7 जागांवर एकहाती सत्ता मिळवण्यात माने – देशमुख यांच्या पॅनलला यश मिळाले आहे. विरोधकांना भोपळाही फोडता न आल्याने गावात देशमुख गटात जल्लोष साजरा केला जात आहे.

विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीत युवा नेते पृथ्वीराज देशमुख यांनी आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणुक लढवणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. यामुळे गावात राजकीय चर्चांना उधान आले होते. गावाचा विकास हाच निवडणुकच्या केंद्रस्थानी असेल तर आम्हाला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. गावाच्या विकासाठी आपण कटीबद्ध आहोत पण निवडणुक लढणार नाही असा पवित्रा माने देशमुख यांनी घेतला होता. आज समोर आलेल्या निकालामुळे माने देशमुख यांच्यावर गावकर्‍यांनी विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, गावतील तरुण पृथ्वीराज माने देशमुख यांच्यासोबत असल्याने विठ्ठलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा गावाच्या विकासावर चर्चा करुन निवडणुक झाली. आगामी पाच वर्षांत गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले. गावातील तरुणांना शेतीतच करिअर आहे हे पटवून देऊन येथील शेतीत नवनवीन प्रयोग जरुन आधोनिक शेती करण्यावर आमचा भर असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment