डॉक्टरचा निष्काळजीपणा बेतला एकीच्या जीवावर! ऑपरेशन दरम्यान महिलेच्या पोटात राहिला टॉवेल

मुंबई । एका डॉक्टरच्या निष्काळजीपणा महिलेच्या चक्क जीवावर बेतला आहे. एका डॉक्टरने २१ वर्षीय महिलेच्या ऑपरेशन दरम्यान पोटात टॉवेल विसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकाराने परिसरात या डॉक्टरच्या निष्काळजीपणाची जोरदार चर्चा होत आहे.

मीरा देवी नावाच्या महिलेला प्रसूतीचा त्रास होऊ लागला. यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, २९ जुलै रोजी डॉक्टरांनी महिलेचं ऑपरेशन केलं. यानंतर महिलेचा त्रास कमी होण्यापेक्षा अधिक वाढला. ऑपरेशननंतर तिला सतत त्रास होऊ लागला. यानंतर डॉक्टरांनी पुन्हा एकदा ऑपरेशन केलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. कारण महिलेच्या पोटात टॉवेल राहिल्याचं निदर्शनास आलं. या टॉवेलचा उपयोग डॉक्टर ऑपरेशन दरम्यान करतात.

महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलं की, मीरा देवीची ही पहिली प्रसूती होती. यासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २९ जुलै रोजी डॉक्टरने ऑपरेशन केलं. मात्र ऑपरेशननंतर तिचं पुन्हा पोट दुखू लागलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या महिलेची प्रकृती नाजूक आहे. तिला सतत रक्त चढवावं लागत आहे. डॉक्टरांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”