सप्टेंबरमध्ये आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात 4.4 टक्क्यांनी वाढ, ‘या’ क्षेत्राने केली सर्वाधिक ‘वाढ’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 8 प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात सप्टेंबरमध्ये वार्षिक आधारावर 4.4% वाढ नोंदवली गेली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि सिमेंट यासारख्या क्षेत्रांच्या चांगल्या कामगिरीमुळे सप्टेंबरमध्ये आठ प्रमुख उद्योगांचे उत्पादन वाढले. सप्टेंबर 2020 मध्ये आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये 0.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये या प्रमुख क्षेत्रांचा विकास दर 11.5 टक्के होता.

हे देशातील 8 प्रमुख उद्योग आहेत
देशातील 8 प्रमुख उद्योगांमध्ये कोळसा, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, पोलाद, सिमेंट, कच्चे तेल, खते आणि ऊर्जा क्षेत्रांचा समावेश आहे.

औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) मध्ये या आठ प्रमुख उद्योगांचे वजन 40.27 टक्के आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2021 मध्ये नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि सिमेंटचे उत्पादन अनुक्रमे 27.5 टक्के, 6 टक्के आणि 10.8 टक्क्यांनी वाढले.

मात्र, सप्टेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनात वार्षिक 1.7 टक्क्यांनी घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत या मूलभूत उद्योगांचा विकास दर 16.6 टक्के होता, जो मागील वर्षी याच कालावधीत 14.5 टक्के होता.

Leave a Comment