बच्चू कडूंच्या नसानसातच आंदोलन, आम्ही त्यांच्या सोबत आहोत; शेतकरी नेते राकेश टिकैत थेट उपोषणस्थळी दाखल

Bacchu Kadu Rakesh Tikait (2)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्या नसानसात आंदोलन भरलेलं आहे. सध्याचे देशातील सरकार हे आंदोलनकर्त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी काळात आंदोलन करणाऱ्यांची संख्या खूपच कमी असेल… आंदोलनकर्त्ये खूपच कमी असतील. मात्र बच्चू कडू हे यातीलच एक आहेत जे शेतकऱ्यांसाठी लढत राहतील असं म्हणत शेतकरी नेते राकेश टिकैत(Rakesh Tikait) यांनी बच्चू कडू यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच सातबारा कोरा करण्यासह इतर काही मागणीसाठी बच्चू कडू यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं आहे. या आंदोलनाला राकेश टिकैत यांनी आज भेट दिली.

आपल्या भाषणात राकेश टिकैत म्हणाले, शेतकऱ्यांच्या लढाईत महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि हरियाणाचा लढा हा कायम एकत्रित राहिला आहे. बच्चू कडू हे काय आज आंदोलन करत नाहीत.. शेतकऱ्यांसाठीचा त्यांचा लढा हा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. जेव्हा ते आमदार होते तेव्हा ते विधानभवनात शेतकऱ्यांसाठी बोलायचे, आता ते आमदार नाहीत तरीही शेतकऱ्यांसाठी तसेच दिव्यांगांसाठी आंदोलन करत आहेत. आज महाराष्ट्र आणि केंद्रात जे सरकार सत्तेत आहे ते आंदोलन कर्त्यांना, तसेच इतर राजकीय पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक मुद्द्याच्या नावाखाली एकमेकांना भडकवण्याचे काम सुरु आहे. अशा या सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्या रक्तातच आंदोलनाची धार आहे असं म्हंटल राकेश टिकैत यांनी बच्चू कडू यांचं कौतुक केलं.

राकेश टिकैत पुढे म्हणाले, म्हणाले, भारतात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात बघायला मिळतात. खरं तर संपूर्ण देशात जी कृषी पॉलिसी लागू आहे तीच महाराष्ट्रातही आहे, मात्र तरीही महाराष्ट्रातूनच सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहेत कारण याठिकाणी शेतकऱ्यांची मजबूत अशी संघटना नाही. सध्याचे देशातील सरकार हे आंदोलनकर्त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी काळात आंदोलन करणाऱ्यांची संख्या खूपच कमी असेल… आंदोलनकर्त्ये खूपच कमी असतील. मात्र बच्चू कडू हे यातीलच एक आहेत जे शेतकऱ्यांसाठी लढत राहतील आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत असं राकेश टिकैत यांनी म्हंटल.