वाठार स्टेशनला आंदोलकांनी रेल्वे रोखली, रेल्वे प्रशासनाची पळापळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

पुणे- मिरज लोहमार्गावर सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे रेल्वे प्रशासनाकडून भुयारी पादचारी मार्गाचे गेले वर्षभरापासून काम रखडले आहे. रेल्वे गेट नंबर 45 च्या भुयारी पादचारी मार्गाचे काम रखडल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाले होते आणि त्यांनी रेल्वे रोखूली. अखेर रेल्वे प्रशासनाने चर्चा करून मागणी मान्य केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या वाठार स्टेशन येथे गेट नंबर 45 येथे एक भुयारी पादचारी मार्ग रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. परंतु या पादचारी मार्गाचे काम गेली एक वर्ष रखडलेले आहे. या पादचारी मार्गामुळे वाठार स्टेशन पंचक्रोशी मधील ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाले आहे. वाठार स्टेशनसह पंचक्रोशी मधील ग्रामस्थांनी याबाबतीत वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार व काम चालू करण्यासंदर्भातली मागणी केली होती. तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाने याबाबत कोणतीच भूमिका घेतली नसल्याने वाठार स्टेशन पंचक्रोशीमधील ग्रामस्थ आक्रमक झाले व यांनी आज सर्व पक्षियांच्या वतीने रेल रोको केला.

वाठार स्टेशन येथे रेल रोको आंदोलन एवढे मोठे होते, की या गेट नंबर 45 च्या रेल्वे रुळावर सर्व आंदोलनकरते बसून ढोल ताशाच्या गजरात रेल्वे प्रशासनाचा निषेध करत होते. तसेच रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाही देत होते. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग नोंदवला. रेल्वे प्रशासना सोबत 3 वेळा बैठका होवूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आजचे आंदोलन तीव्र करण्यात आले. तसेच दिलेल्या मुदतीत काम न झाल्यास पुढील आंदोलन हे आक्रमक असणार असून रेल्वे ट्रक बंद पाडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.