Wednesday, March 29, 2023

निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांना पोलीस संरक्षण द्या – शिवराम ठवरे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर ) यांच्या कीर्तनातील काही वाक्यांबाबत शासनाच्या वैद्यकीय विभागाकडून नोटीस काढण्यात आल्यामुळे मागील चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे निवृत्तीची महाराज इंदुरीकर यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरॊबर कीर्तनातील गर्दीच्या ठिकाणी काही विपरीत घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे इंदोरीकर महाराजांना पोलीस संरक्षण द्या अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते शिवराम ठवरे यांनी केली आहे.

WhatsApp Image 2020-02-18 at 1.01.22 PM

- Advertisement -

निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या कीर्तनातून स्त्रियांची बदनामी करतात असे म्हणणारा एक वर्ग आणि कीर्तनाच्या माध्यमातून महाराज प्रबोधन करत असताना ग्रामीण लोकभावना व्यक्त करतात. त्यामुळे त्यात काही चुकीचे नाही, असे म्हणणारा एक मोठा वर्ग अशी विभागणी झालेली दिसून येत आहे. संपूर्ण सोशल मीडियात गेले काही दिवस यावरच चर्चा सुरु असून महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

निवृत्ती महाराजांना मानणारा खूप मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे त्यांच्या कीर्तनाला हजारोंच्या संख्येने श्रोते जमा होत असतात. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील काही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी महाराजांच्या कीर्तनावर बंदी घालावी अशी चर्चा करत आहेत आपणांस विनंती आहे कि, महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने याबाबत माहिती घेऊन लवकरात लवकर निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांना पोलीस संरक्षण दयावे आणि कीर्तनाच्या ठिकाणी सुरक्षेच्या द्रुष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याचा सूचना देण्यात याव्यात.अशी मागणी करण्यात आली आहे.