Wednesday, February 1, 2023

सौदी अरेबियाची PIF कंपनी करणार Reliance Retail मध्ये 9555 कोटींची गुंतवणूक

- Advertisement -

नवी दिल्ली । सौदी अरेबियाची गुंतवणूक कंपनी PIF (Public Investment Fund) ने रिलायन्स रिटेलमधील हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. PIF 2.04 टक्के हिस्सा 9,555 कोटी रुपयांना खरेदी करेल. PIF सौदी अरेबियाचा सोव्हरेन वेल्थ फंड आहे. PIF ने (पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड) यापूर्वी देखील जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आहे. PIF ने त्यातील 2.32 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी 11367 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

रिलायन्स रिटेलने आतापर्यंत 47265 कोटी रुपये जमा केले आहेत
रिलायन्स रिटेल अवघ्या काही महिन्यांतच परदेशी गुंतवणूकदारांकडून फंड उभारण्यात यशस्वी झाली आहे. देशातील या सर्वात मोठ्या रिटेल बिझिनेस कंपनीने काही महिन्यांतच 47265 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

- Advertisement -

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ( Mukesh Ambani, Chairman and Managing Director of Reliance Industries) म्हणतात की, सौदी अरेबियाशी आमचे (Reliance) दीर्घ संबंध आहेत. त्याचबरोबर PIF सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला प्रगती देण्यास आघाडीवर आहे.

रिलायन्स रिटेलमधील महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून मी PIF चे स्वागत करतो. रिलायन्स रिटेलसह भारतीय रिटेल क्षेत्राला पुढे नेण्यासाठी PIF चे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरेल.

रिलायन्सने 2006 मध्ये देशात संघटित रिटेल व्यवसायात प्रवेश केला. सर्वप्रथम या कंपनीने हैदराबादमध्ये रिलायन्स फ्रेश स्टोअर सुरू केले.

जवळच्या बाजारपेठेतून ग्रॉसरीज आणि भाजीपाला ग्राहकांना द्यावा अशी कंपनीची कल्पना होती. 25,000 कोटी रुपयांपासून कंपनीने ग्राहक टिकाऊ वस्तू, फार्मसी आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स देण्यास सुरवात केली. यानंतर कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि कॅश अँड कॅरी बिझिनेसमध्येही मोर्चा वळविला.

इलेक्ट्रॉनिक रिटेल चेन कंपनीने 2007 मध्ये लाँच केली होती. यानंतर 2008 आणि 2011 मध्ये रिलायन्सने रिलायन्स ट्रेंड्स आणि रिलायन्स मार्केटच्या माध्यमातून फॅशन आणि होलसेल व्यवसायात प्रवेश केला. 2011 सालापर्यंत रिलायन्स रिटेलच्या विक्रीतून मिळणारी कमाई 1 अब्ज डॉलर्सवर गेली होती.

रिलायन्स रिटेलचे लक्ष लाखो ग्राहक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (MSME) सबलीकरण करण्यावर तसेच जागतिक आणि देशांतर्गत कंपन्यांशी प्राधान्यीकृत भागीदार म्हणून जवळून काम करून भारतीय किरकोळ क्षेत्राला संगठित करण्यावर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.