पुण्यालगतच्या सॅनिटायझर तयार करणार्‍या कंपनीला लागलेल्या आगीत 15 जणांचा होरपळून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीतील एसव्हीएस या कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली होती. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून, काही कामगार बेपत्ता आहेत.तर आतापर्यंत २० कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. या कंपनीत केमिकल बनवण्याचे काम सुरू होते. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मोठया प्रमाणावर जीवितहानी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्यादेखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आणि अधिकार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवत सध्या कुलिंगचं काम सुरू केलं आहे. या शिवाय रूग्णवाहिका देखील दाखल झालेली आहे.चिंताजनक बाब म्हणजे या कंपनीत काही कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशीमधील उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या केमिकल कंपनीला आज दुपारी दोन वाजण्याचा सुमारास भीषण आग लागली. जेव्हा हि आग लागली तेव्हा कंपनीत ३७ कामगार होते. या आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. या आगीमुळे परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर देखील पसरला आहे.

Leave a Comment