पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने केली बॉयफ्रेंडची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गर्लफ्रेंडनेच आपल्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी गर्लफ्रेंड स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. रागाच्या भरात तिनं बॉयफ्रेंडची गळा दाबून हत्या केली आहे. सतत किरकोळ गोष्टीवरुन होणाऱ्या वादामुळे तिनं रागाच्या भरात हे टोकाचं पाऊल उचललं. पुण्यातल्या भेकराईनगरमध्ये ही घटना घडली आहे.

मृत तरुणाचे नाव सोनल पुरुषोत्तम दाभाडे असे आहे. तर रोहिणी रामदास युनाते असं आरोपी तरुणीचं नाव आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना दोघांची एकमेकांसोबत ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघेजण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. हि घटना 29 ऑगस्ट रोजी हिंद कॉलनी येथील राहत्या घरात घडली आहे. सुरुवातीला या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पण या तरुणाचा शवविच्छेनाचा अहवाल समोर आल्यानंतर तरुणीनं हत्या केली असल्याचा उलगडा झाला.

बुधवारी या तरुणीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याता आला असून पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. 29 ऑगस्ट रोजी सोनलचा आणि रोहिणीचा वाद झाला होता. त्यामुळे रागात रोहिणीनं सोनलला ढकलल त्यात तो भिंतीवर आपटला त्यानंतर तिने रागाच्या भरात त्याचा गळा दाबला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Leave a Comment