Pune Delhi Train : पुणेकरांसाठी खूषखबर ! 16 तारखेपासून सुरु होणार ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Delhi Train : भारतात आजही लाखो लोक रेलवेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. राज्यातही रेलवे प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वेचा प्रवास हा कमी पैशात होतो. शिवाय रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतात पसरले आहे. पुणे विभागातून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकरिता आता एक खुश खबर आहे. कारण पुणे विभागातून बंद झालेली एक रेलवे आता पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू होणार आहे. हो…! आम्ही ज्या रेल्वेबाबत सांगा आहोत ती पुणे -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (Pune Delhi Train ) (पुणे ते दिल्ली) येत्या १६ जानेवारीपासून ही रेल्वे पुन्हा सुरु होणार आहे.

उत्तर मध्य रेल्वे आग्रा विभागाच्या मथुरा स्थानकावरून सुरू असलेल्या यार्ड रिमॉडेलिंगच्या कामामुळे भोपाळ विभागातून जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या यामध्ये पुणे ते हजरत निजामुद्दीन ही एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आली होती. रिमॉडेलिंगचे काम आता पूर्ण झालं असल्यामुळे इतर गाड्यांबरोबरच पुणे निजामुद्दीन गाडी (Pune Delhi Train ) सुद्धा पूर्वीच्या वेळापत्रकानुसार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये सहा गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.

रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक 12148 हजरत निजामुद्दीन कोल्हापूर एक्सप्रेस 11 जानेवारीला, 12264 हजरत निजामुद्दीन पुणे एक्सप्रेस 11 जानेवारीला,12263, पुणे – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस  (Pune Delhi Train ) 16 जानेवारी आणि 19 जानेवारी, 12494 हजरत निजामुद्दीन मिरज एक्सप्रेस 11 जानेवारीला नियोजित वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

मात्र ट्रेन क्रमांक 12147 कोल्हापूर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (Pune Delhi Train ) 16 जानेवारीला आणि ट्रेन क्रमांक 11077 पुणे जम्मू तावी झेलम एक्सप्रेस 10 आणि 11 जानेवारीला त्यांच्या मूळ स्थानकावरून सुटतील. आग्रा कॅंट-मितावली-गाझियाबाद-एन दिल्ली मार्गे वळवलेल्या मार्गाने त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचणार आहेत.