पुणे अग्निशमन दलातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

पुणे । महाराष्ट्रातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पोलीस कर्मचारी, वैद्यकीय कमर्चारी यांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्यांनतर आता अग्निशमन दलातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार पुणे अग्निशमन दलात चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी अग्निशमन दलात चालक म्हणून कार्यरत असलेला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीला दुजोरा दिला असून. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध प्रशासनाकडून घेतला जात असल्याचे एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

You might also like