धक्कादायक ! किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची हत्या

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये किरकोळ कारणावरुन पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि पतीने पत्नीला मारहाण केली. या मारहाणीमध्ये पत्नीचा मृत्यू झाला. मुलं भांडण करतात आणि त्रास देतात या कारणावरुन पती आणि पत्नीत हा वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की दोघांत कडाक्याचे भांडण झाले.

यानंतर पतीने रागाच्या भरात पत्नीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे नाव आसमा तौसिफ हवारी असे आहे. हि घटना पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भवानी पेठ परिसरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी पती हौसिफ हवारी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी हत्या झाल्याने पुणे हादरले आहे. सोमवारी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुण बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. दुचाकीवरून अचानक आलेल्या मारेकऱ्यांनी व्यावसायिकावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत संबंधित व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला होता. समीर मनूर शेख असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते.