पुण्यात चोरांना पाहून पोलिसांनीच काढला पळ, पहा घटनेचा CCTV व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । सोसायटीमध्ये पाच फ्लॅटमध्ये चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांना पाहून गस्तीवरील पोलीसच पळून गेल्याचा प्रकार सीसीटीव्हीमुळे उघड झाला आहे. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली. औंध चोरी प्रकरणी पोलीस शिपाई अनिल अवघडे आणि पोलीस हवलदार प्रवीण गोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस खात्याची प्रतीमा मलीन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातल्या औंधमध्ये सिद्धार्थनगर भागातल्या, शैलेश टॉवर सोसायटीमध्ये 28 डिसेंबरला रात्री 3 च्या सुमाराला 4 चोरटे घुसले, वॉचमनला दोघांनी चाकू दाखवला आणि पकडून ठेवले. दोघांनी वर जाऊन कटरच्या सहाय्यानं फ्लॅटचं कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. रहिवाशांनी पोलिसांना फोन केला. पोलीस गाडीवरून तात्काळ हजरही झाले. त्यांनी चोरांना पाहिलं पण बंदूक असतांनाही त्यांना पकडण्याचा साधा प्रयत्नही केला नाही.

https://twitter.com/HelloMaharashtr/status/1343880716099047425

त्याऐवजी पोलीस पळून जाताना दिसतायत. चार बंद फ्लॅटचं चोरांनी कूलूप तोडलं पण फारसं काही हाती लागलं नाही. एका घरातला LCD TV चोरला. पोलीसांकडे वायरलेस फोन होता. त्यांनी ठरवलं असतं तर पोलिसांनी पुढे माहिती पाठवून चोरट्यांना तात्काळ पकडू शकले असते. पण या घटनेत पोलिसांकडून तसे काहीही झालेले दिसले नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment