राज्यात ओमिक्रोनचा कहर; पुण्यात सापडले 6 रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

पुणे | ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्ट चा महाराष्ट्रात शिरकाव झाला असून डोंबिवली नंतर आता पुण्यात ओमीक्रोन चे 6 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर आता पुण्यातही ओमायक्रॉचे 7 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी पुणे शहरात 1 तर पिंपरी चिंचवडमध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत.

यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 8 झाली आहे. त्या सहा जणांपैकी 3 जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर तिघे त्यांचे संपर्कातील आहेत.

पुणे शहरातील 47 वर्षीय पुरूषाला या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालाने सिद्ध झाले आहे. पिंपरीमधील सहाही रुग्ण एकाच कुटूंबातील आहे. नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून 44 वर्षीय महिला तिच्या भावाला पिंपरी चिंचवडला भेटण्यासाठी आली होती. तिच्यासोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ यासह त्याच्या दोन्ही मुली असे एकूण 6 जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रविवारी संध्याकाळी दिला आहे.

नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर 5 जणांना कसलीही लक्षणे नाहीत. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची 44 वर्षांची महिला तिच्या 12 आणि 18 वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिद्ध झाले आहे.

Leave a Comment