व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सैदापूर येथे मंगळसुत्र चोरणाऱ्यास कारावासाची शिक्षा

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

लॉकडॉउन काळात विद्यानगर- सैदापूर येथील वृध्द महिलेच्या मंगळसुत्र चोरी प्रकरणी कराड कोर्टाने आरोपीस 1 वर्ष कारावास आणि 1 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात पोलिसांच्या रेकाॅर्डवरील शितल गोरख काळे (वय- 40 वर्षे, रा. ऑगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी, विद्यानगर- सैदापूर भागात एका चोरट्याने लाॅकडाऊनच्या काळात रात्रीचा घरात प्रवेश करून 70 वर्षे वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरी केल्याची घटना घडली होती. चोरट्याने चोरी करून पळून काढला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कराड शहर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेवून मुद्देमाल जप्त केला होता. या गुन्ह्यातील आरोपी शितल गोरख काळे यास कराड कोर्टाने एक वर्ष कारावास आणि 1 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय गोडसे, पोलिस हवालदार श्री. काटवटे, पोलिस नाईक संजय जाधव, कराड शहर पोलिस नाईक मारुती लाटणे, पोलिस नाईक विनोद माने यांनी या चोराच्या तपासाचे काम पाहिले. सरकारी वकील शिला नाईक यांनी कामकाज पाहिले.