पंजाब निवडणूक : अंतर्गत वादामुळेच काँग्रेसचा सुफडा साफ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाब विधानसभा निवडणुकीत आप आदमी पक्षाने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली असून तब्बल 90 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. पंजाब हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पक्षात घडलेल्या राजकीय घडामोडी आणि अंतर्गत कलह यामुळे काँग्रेसला खूप मोठा झटका पंजाबमध्ये बसला आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा तडकाफडकी घेतलेला राजीनामा अन् त्यांनतर नवज्योत सिंग सिद्धू आणि नवे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यातील कलह यामुळे काँग्रेसला पंजाब सारखे हातातली राज्य गमवावे लागले.

पंजाब काँग्रेस मधील अंतर्गत वाद हेच काँग्रेसच्या पराभवाचे मुख्य कारण आहे. सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री अमरंदीर सिंग यांनी सिद्धू यांना कंटाळून काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर आपणच पंजाबचे मुख्यमंत्री होऊ असे सिद्धू यांना वाटत होते. मात्र राहुल गांधी यांनी मास्टर स्ट्रोक खेळत दलित समाजाचे चरणजीत चन्नी यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी बसवले.

चरणजीत चन्नी मागासवर्गीय समुदायातील ते पंजाबचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले. पंजाबमध्ये जवळपास एक तृतीयांश दलित लोकसंख्या आहे. त्यामुळं या माध्यमातून काँग्रेसनं दलित वोटबँकेला आकर्षित करण्याच्या संधीचं सोनं केलं. मात्र त्यानंतर नाराज झालेल्या सिद्धू यांनीच काँग्रेस ला रामराम ठोकला. ज्या सिद्धूंसाठी अमरिंदर सिंग यांना बाहेरचा सत्ता दाखवला गेला. पण आता त्याच सिद्धूंमुळे राहुल गांधी आणि काँग्रेसची फजिती उडवल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, पंजाब मध्ये आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमता कडे वाटचाल केली आहे. 117 मतदार संघ असलेल्या पंजाब मध्ये आम आदमी पक्षाने आत्तापर्यंत 90 जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस 13 जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजप 5 जागांवर आघाडीवर असून इतर 3 आहेत.

Leave a Comment