पुणे : मानसिक ताण तणाव यामुळे सध्या तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे येथे राहणार्या एका तरुणाने आत्महत्या करत असल्याचं स्टेट्स WhatsApp वर ठेवल्यानं त्याला वाचवण्याकरता शेकडो तरुण सरसावले आहेत. पुष्कर काळे असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.
https://twitter.com/yogeshsjagtap/status/1443624467285127174?s=19
हाती आलेल्या माहितीनुसार, पुष्कर काळे/दत्तात्रय काळे या तरुणाने गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान आपल्या WhatsApp वर हे जग सोडण्याची वेळ आता आली आहे असा स्टेट्स ठेवला. यानंतर तो स्टेट्स पाहून त्याच्या संपर्क यादीतील तरुणांनी तात्काळ त्याच्याशी संपर्क केला मात्र मोबाईल फोन बंद येत आहे. यानंतर सोशल मिडियात ही गोष्ट वार्यासारखी पसरली अन् पाहता पाहता मोठ्या संख्येने तरुण सदर पुष्कर यांना वाचवण्याकरता सरसावले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4730293803671205&id=100000718951444
दरम्यान, 12 पोलीस आणि 50 तरुण सध्या पुष्कर यांचा शोध घेत आहेत. दत्तात्रयच्या स्टेट्सनंतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. पोलिसांनीही मध्यरात्री १ वाजेपर्यंत दत्तात्रयचे मेसवाले, कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी यांच्याशी फोनवर संपर्क साधून दत्तात्रयचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अद्यापही दत्तात्रयचा शोध सुरूच असून त्याबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास त्याची तात्काळ कल्पना – 9970070705 या क्रमांकावर द्यावी असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख यांनी केलं.
वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे सिनिअर पीआय शंकर खटके यांनी तरुणांमधील ताण तणाव व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा बनला असल्याचं स्पष्ट केलं. स्पर्धा परिक्षेतील अपयश किंवा आयुष्यातील एखादा चुकलेल्या निर्णयाने खचून न जाता तरुणांनी शांत डोक्याने विचार करायला हवा असंही ते पुढे बोलताना म्हणाले. सोशल मीडियाच्या आभासी जगात हजारो मित्र जोडूनही तरुणांना एकटेपणा, नैराश्याला सामोरं जावं लागतंय. कुटुंबाशी तुटलेला संवाद, कोविड परिस्थितीत झालेलं शैक्षणिक नुकसान यामुळं तरुणांमध्ये ताण-तणावाची स्थिती आहे. या स्थितीत तरुणांना समजून घेण्याची गरज असून मित्र-मंडळी आणि पालकांनी याबाबतीत सतर्क राहणं गरजेचं असल्याचं मत खटके यांनी व्यक्त केलं.
यावेळी कल्याणी संध्या अंकुश, पैगंबर शेख, कृतार्थ शेवगावकर, योगेश जगताप, शेखर रणवरे, दिनेश शेटे, दीपक शिंदे, सागर मोरे, अजिंक्य ठाकरे, अक्षय उकांडे, नितीन गांगर्डे आणि इतर तरुण मंडळी मदतकार्यासाठी हिरीरीने सहभागी झाली.