‘प्रश्नचिन्ह’ शाळेसमोर गंभीर प्रश्नचिन्ह! पटलं तर ‘अशी’ करा मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती | जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे फासेपारधी व कोरकू आदिवासी मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेत यावर्षी पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. फासेपारधी समाजातीलच श्री. मतीन भोसले यांनी अतिशय कष्टातून व असंख्य अडचणींवर मात करून ही शाळा उभी केली आहे. ज्यांच्या डोक्यावर छत नव्हते अश्या मुला-मुलींसाठी हक्काचे छत व शिक्षणाची सोय यानिमित्ताने होत आहे. कित्येक वर्षांच्या अभावग्रस्ततेनंतर फासेपारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या या प्रयत्नांना समाजाची तेवढीच तोलामोलाची साथ हवी आहे. ”शाळेला मदतीची गरज आहे” असे आवाहन संचालक मतीन भोसले यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे ४७१ विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी ‘फासे पारधी’ आणि ‘कोरकू आदिवासी’ जमातीचे आहेत. स्वच्छ व निरोगी पाण्याचा पहिला स्रोत शाळेपासून २.७५ किमी अंतरावर आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दररोज इतका प्रवास करणे हे शालेय मुलांसाठी अन्यायकारक आहे. म्हणूनच पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था स्थापित करण्याचा शाळेचा शाळेचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर ४७१ आदिवासी मुलांना पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. ‘हॅलो महाराष्ट्र’ने नेहमीच अश्या समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणाऱ्या शाश्वत प्रकल्पांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम आपल्या अल्प कारकिर्दीत केले आहे. वाचकांनीही भरघोस मदत करून आपला वाटा उचलावा अशी विनंती व शिफारस आम्ही करत आहोत.

मदत करण्यासाठी खालील माध्यमांचा पर्याय उपलब्ध आहे.

फंडरायझिंग दुवा –
https://bit.ly/prashnachinhatribalschoolfundraising

सदर शाळेबाबत अधिक माहितीसाठी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या ‘पीपल्स आर्काइव्ह ऑफ रूरल इंडियाने’ या शाळेचे केलेले कव्हरेज आपण इथे वाचू शकता.????????
https://ruralindiaonline.org/articles/pardhi-school-bulldozed-by-prosperity-highway/

खालील समाजमाध्यमांद्वारे आपण शाळेशी संपर्कात राहू शकता

Instagram:
https://instagram.com/prashnachinha_tribal_school?igshid=a4lco206cad4

Facebook:
https://www.facebook.com/Prashnachin_tribal_school-प्रश्नचिन्ह-110205484063897/

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment