रवीश्चंद्रन अश्विनचे दमदार शतक ; केला ‘हा’ मोठा पराक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय अष्टपैलू रावीश्चंद्रन अश्विनने प्रतिकूल परिस्थितीत दमदार शतक झलकावत इंग्लिश गोलंदाजाना अक्षरशः रडवले.अश्विनने 148 बॉलमध्ये 106 रन केले आहेत. अश्विनच्या या खेळीने भारताने इंग्लंड संघापुढे 482 अशा विशाल धावसंख्येच आव्हान ठेवलं आहे.

आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आश्विनने पहिल्या डावात पाच विकेट घेतल्या तर आर दुसऱ्या डावात फलंदाजीसह शानदार शतक झळकावले. अश्विनने कसोटी कारकीर्दीत पाचव्यांदा शतक ठोकले. या शतकी खेळीमुळे आर अश्विननेही एक मोठी कामगिरी बजावली.

अश्विन हा आशियातील पहिला क्रिकेटपटू आहे ज्याने 3 वेळा शतकीय खेळीसह डावात पाच विकेट घेतले आहेत. इयान बोथमने 5 वेळा हा पराक्रम केला आहे. त्याचवेळी, साकिब अल हसन, गॅरी सोबर्स, मुश्ताक मोहम्मद, जॅक कॅलिस यांनी 2-2 वेळा हे कामगिरी केली आहे. अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध याआधीचे चारही शतकं ठोकले आहेत. पाचवं शतक त्याने इंग्लंड विरुद्ध ठोकलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment