आर.टी. ई. प्रवेशाला उस्फुर्त प्रतिसाद; अवघ्या सात दिवसात साडेपाच हजार अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : आर.टी.ई प्रवेश 2021-22 या वर्षासाठी तीन मार्चपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अवघ्या सात दिवसात जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत . त्यामुळे यावर्षी आरटीई प्रवेशाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आलीय.

यावर्षी मराठी प्रवेश प्रक्रियेत 603 शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केलेली आहे. त्यासाठी एकूण तीन हजार 621 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. पालकांना 21 मार्च दरम्यान प्रवेश अर्ज नोंदणीची मुदत देण्यात आली आहे परंतु बुधवारपर्यंत म्हणजे अवघ्या सात दिवसातच 5 हजार 601 अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातून पहिली साठी 3 हजार 601 विस्तार प्री-प्रायमरी साठी दोन शाळांमधून चार जागांची शब्द आहे अर्ज प्रक्रियेसाठी पालकांना ओळखपत्र म्हणून आधार पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्सचा परवाना ग्राह्य धरण्यात येणार आहेत.आरटीई प्रवेशाची शेवटची मुदत 21 मार्चपर्यंत असल्याची माहितीही शिक्षण विभागाकडून देण्यात आलीय.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment