सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील वाय. सी. कॉलेज परिसरामध्ये युवकांच्यात जोरदार हाणामारी झालेली आहे. या युवकांच्या हाणामारीत दगडफेक झाल्याने लेडीज शॉपीचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. निर्भया पथकाचा काॅलेज परिसरात वचक कमी झाल्याने वारंवार हाणामारीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.
वाय. सी. काॅलेज किरकोळ कारणावरून युवकांच्यात जोरदार हाणामारी झाली. काॅलेज परिसरात अचानक गोंधळ उडाळ्याने मुली पळाल्या. तसेच एक युवकाने लेडीज शाॅपी परिसरात असलेला दगड उचलून फेकला असल्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. काॅलेज सुरू झाल्यापासून वारंवार हाणामारीचे प्रकार सुरू झालेले आहेत. परंतु यावर पोलिसांचा वचक असलेला दिसून येत नाही.
काॅलेज परिसरात होणाऱ्या या राड्यावर नियंत्रणासाठी निर्भया पथकाची नेमणूक पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. मात्र, सध्या हे पथक सक्षमरित्या आपले काम करताना आढळून येत नाही. तेव्हा या पथकाचीच आता उजळणी पोलिस अधीक्षकांनी घेणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.