पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटणारच ; राहुल गांधींचा निर्धार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस बलात्कार प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली असून उत्तरप्रदेश सरकारचा निषेद केला जात आहे. तसेच या दुर्घटनेमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. गुरुवारी दुपारी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी ताफा घेऊन निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यात थांबवलं. यावेळी राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता राहुल गांधीनी पुन्हा एकदा हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याचा निर्धार केला आहे.

“जगातील कोणतीही ताकद मला हाथरस येथील दुखी कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. “पीडित मुलीबरोबर आणि कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी केलेला व्यवहार मला तर मान्य नाहीच शिवाय कोणत्याही भारतीयांना हा व्यवहार पटला नसेल,” असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like