कठोर परिश्रम करू, पुन्हा लढू; गुजरात निकालावर राहुल गांधींचे Tweet

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली. आपच्या एंट्री मुळे गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झालं आहे. दोन्ही राज्यातील निवडणूक निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गुजरातच्या जनतेचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. आम्ही पुनर्रचना करू, कठोर परिश्रम करू आणि देशाच्या आदर्शांसाठी आणि राज्यातील जनतेच्या हक्कांसाठी लढत राहू असं राहुल गांधी यांनी म्हंटल.

यावेळी त्यांनी हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या विजयाबद्दल जनतेचं आभार मानले आहे. या निर्णायक विजयासाठी हिमाचल प्रदेशातील जनतेचे मनःपूर्वक आभार. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे हार्दिक अभिनंदन. या विजयासाठी तुमची मेहनत आणि समर्पण खरोखरच शुभेच्छांना पात्र आहे. मी पुन्हा आश्वासन देतो की, जनतेला दिलेले प्रत्येक वचन लवकरात लवकर पूर्ण केले जाईल असं राहुल गांधींनी म्हंटल.

दरम्यान, गुजरात मध्ये तिरंगी लढतीत भाजपने बाजी मारत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा सुफडा साफ केला. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशात मात्र भाजपला हातची सत्ता गमवावी लागली. हिमाचल मध्ये काँग्रेसने ४० जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला मोठं असं यश मिळालं नाही. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला ५ जागा मिळाल्या तर हिमाचल प्रदेशात त्यांना भोपळाही फोडता आला नाही.