राहुल गांधींनी केला दिल्ली हिंसाग्रस्त भागाचा दौरा; म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी संध्याकाळी हिंसाचारग्रस्त उत्तर-पूर्व दिल्लीतील ब्रिजपुरी भागाचा दौरा केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदारांच्या शिष्टमंडळाने हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केला.यावेळी हिंसाचारा दरम्यान जाळलेल्या एका शाळेची त्यांनी पाहणी केली.

यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की,”दिल्लीच्या हिंसाचारात एकात आणि बंधुभाव जाळला गेला. अशा प्रकारच्या राजकारणामुळे भारत आणि भारत मातेचे नुकसान झाले आहे. ते पुढे म्हणाले,”ही शाळा दिल्लीचे भविष्य होती मात्र द्वेष आणि हिंसाचाराने तिला नष्ट केलं. या हिंसाचारामुळे भारत मातेला फायदा होणार नाही. प्रत्येकाने या वेळी एकत्र येऊन काम करत भारताला पुढे नेले पाहिजे. देशातील हिंसाचारमुळे झाल्यास जगातील भारताच्या प्रतिष्ठेला तडा जातो.”

सर्वांनी एकत्र येत काम केले पाहिजे. सर्वांना एकत्र जोडूत भारताला पुढे नेले पाहिजे. बंधुता, ऐक्य, प्रेम ही आपली शक्ती आहे. त्याची या हिंसाचारात होळी केली गेली. जगातील आपली प्रतिष्ठा येथे जाळली गेली आहे. असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले. दिल्लीतील हिंसाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या प्रतिनिधीमंडळात राहुल गांधींशिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, कुमारी सेलजा आणि मुकुल वासनिक, मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला, खासदार के.के. सुरक्षा आणि गौरव गोगोई आणि इतर काही नेते यात सामील आहेत. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 48 लोक ठार तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment