“प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान”; राहुल गांधींची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वाढत असललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे केंद्र सरकारविरोधात जनतेतुन प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बुधवारी इंधनाच्या दरात लिटरमागे 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. मुंबईत पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर मागे 84 पैशांनी वाढला आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान”, अशी टीका ट्विटद्वारे गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट केले असून त्यांनी ट्विटद्वारे पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये अफगाणीस्ता या ठिकाणी पेट्रोलचे दर 66.99 रुपये प्रति लीटर आहे. तर पाकिस्तानात 62.38 रुपये प्रति लीटर, श्रीलंकेत 72.96 रुपये प्रति लीटर, बांग्लादेशमध्ये 78.53 रुपये प्रति लीटर, भुतानमध्ये 86.28 रुपये प्रति लीटर, नेपाळमध्ये 97.05 रुपये प्रति लीटर

तर भारतात 101.81 रुपये प्रति लीटर पेट्रोल असे सांगितले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्यावरही शेवटी टीका केली आहे. ‘प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान। जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥’ अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.