गुटखा विक्रेत्याच्या घरावर छापा; सव्वाचार लाखांचा साठा जप्त  

औरंगाबाद – गुटखा विक्रेत्याच्या घरावर छापा मारून गुन्हे शाखा पोलिसांनी चार लाख 24 हजार 515 रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. हि कारवाई 29 मार्चला दुपारी सव्वातीनच्या सुमारास दौलताबादेतील राजवाडा भागात करण्यात आली. सय्यद अजिम सय्यद युनूस असे गुटखा विक्रेत्याचे नाव आहे.

राज्यात प्रतिबंधीत पान मसाला, सुगंधीत तंबाखू व गुटख्याचा दौलताबादेतील राजवाडा भागात मोठा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. या माहितीआधारे गुन्हे शाखा पोलिसांनी 29 मार्च रोजी दुपारी सय्यद अजीमच्या घरावर छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी विविध कंपनीचा गुटखा, तंबाखू आणि पान मसाला पकडला. यानंतर सय्यद अजिमला दौलताबाद पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.

हि कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, सहायक फौजदार रमाकांत पटारे, जमादार विजय निकम, पोलिस नाईक राजेंद्र साळुंके, नितीन धुळे, संदीप सानप व अनिता त्रिभुवन यांनी केली.