इनकम टॅक्स विभागाकडून छापेमारी; दिलीप वळसे पाटलांच्या निकटवर्तीयांची चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्राप्तिकर विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या संस्था, कारखान्यांवर छापेमारी केली जात आहे. दरम्यान आज पुन्हा प्राप्तिकर विभागाकडून पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील दोन दूध संस्थांवर आज छापा टाकण्यात आला. विशेष म्हणजे या दोन दूध संस्थांपैकी एक हि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांची असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात राजकीय चर्चां सुरु होत असताना तसेच भाजप महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद सुरु करताना काल मध्यरात्री अचानक केंद्रीय तपास यंत्रणा पुण्यात दाखल झाली. प्राप्तिकर विभागातील चार पथकांकडून गृहमंत्री वळसे पाटलांच्या मतदारंसघात छापेमारी करण्यात आली असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोवर्धन दूध डेअरी आणि पराग दूध डेअरीची तपासणी केली जात आहे. या डेअरी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्ती यांची असल्याची माहिती मिळत आहे.

असा पडला छापा –

प्राप्तिकर विभागातीळ चार पथकातील अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर येथील पराग डेअरीवर काल रात्री 2 वाजून 15 मिनिटांनी छापा टाकला. त्यानंतर अवसरी येथील पीरसाहेब डेअरीवर आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी छापा टाकला. यामध्ये देवेंद्र शहा यांच्या निवासस्थानी सकाळी 7 वाजता छापा टाकण्यात आला. त्यानंतर नंतर देवेंद्र शहा यांच्या मित्रावर सकाळी 9 वाजता छापा टाकण्यात आला. या छाप्यात प्राप्तिकर विभागाने अनेक कागदपत्रे जप्त केली असून, त्यांची तपासणी सुरू आहे.

You might also like