हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गौतम अदानी हे भारतीय विश्वातील एक आघाडीचे नाव आहे. काही महिन्यांच्या कालावधी आधी हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे गौतम अदानी हे गोत्यात आले होते. पण आपल्या लढाऊवृत्तीमुळे व्यवसायाच्या नवनवीन संधी शोधत असतात. आताच्या घडीला हळुहळू हिंडनबर्गप्रकरणातून सावरत असलेल्या गौतम अदानींनी आपला व्यवसाय पुन्हा स्थिरस्थावर करण्यात मग्न असून त्यांची घोडदौड हि पूर्वपदावर येत आहे. याचाच प्रत्येय देणारी हि बातमी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) ह्या अदानी समूहातील कंपनी बद्दल आहे . नुकतेच अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) कंपनीने एक नवा विक्रम रचत 2022-23 ह्या आर्थिक वर्षा 120.51 MMT रेल्वे कार्गो हाताळले आहे, जे मागील आर्थिक वर्षातील 98.61 MMT पेक्षा 22.2% जास्त आहे.
रेल्वेने कमावले 14,000 कोटी
भारतीय रेल्वेच्या जनरल पर्पज वॅगन इन्व्हेस्टमेंट स्कीम (GPWIS) अंतर्गत-अदानी पोर्ट्सने जाहीर केलेल्या माहिती नुसार , भारतीय रेल्वेद्वारे हाताळल्या जाणार्या कार्गोमध्ये वार्षिक 62% ची वाढ नोंदवली गेली आहे. मुंद्रा पोर्टने 2023 मध्ये 15,000 हून अधिक कंटेनर ट्रेन्स हाताळल्या आणि भारताचे EXIM (निर्यात आयात) गेटवे म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे.आर्थिक वर्ष 2023 मध्ये, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) ने भारतीय रेल्वेसाठी रेल्वे कार्गोमधून सुमारे 14,000 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. आर्थिक वर्ष-2023 मध्ये मुंद्रा बंदराद्वारे चालवल्या जाणार्या डबल-स्टॅक कंटेनर ट्रेनमध्ये 4.3% ची वाढ नोंदवली गेली आहे.
डबल स्टॅक लोडिंगचा फायदा
कंपनीने जाहीर केलेल्या माहिती नुसार असे म्हटले आहे की, ट्रेन्सवरील कंटेनरचे डबल स्टॅक लोडिंग ऊर्जा कार्यक्षम आणि विश्वासार्ह पद्धतीने वाहतूक केल्यास ,एकूण प्रति युनिट खर्च कमी होतो आणि यामुळेच ग्राहकांचे समाधान होते. रेल्वे वाहतुकीच्या वापरामुळे मालवाहतुकीचा कार्बन फूटप्रिंट कमी होतो आणि कंटेनर ट्रेनच्या कार्यक्षमतेमुळे अतिरिक्त ट्रक वाहतुकीची गरज कमी भासते. त्यामुळे कार्बन उत्सर्जनदेखील कमी होते.