Railway कडून 212 गाड्या रद्द !!! आपल्या गाडीचे स्टेट्स तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विविध कारणांमुळे Railway ने आज म्हणजेच 13 जुलै रोजी 212 गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय रेल्वेने 25 गाड्या अंशत: रद्द केल्या असून 27 गाड्यांचे डेस्टिनेशन स्‍टेशन बदलले आहे. या रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पॅसेंजर, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे स्टेशनला जाण्यापूर्वी आपल्या गाडीचे स्टेट्स जाणून घेतले पाहिजे.

Indian Railways gets more 'Kavach': How this Made-in-India tech works for  trains | Mint

महाराष्ट्र, दिल्ली-एनसीआर आणि ईशान्य भागात मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, नवी दिल्ली, आसाम, काश्मीर, झारखंड आणि राजस्थानमध्ये रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. 13 जुलै 2022 रोजी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट Railway च्या नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टीमच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

IRCTC Latest News: Railways to Restore Covid Special Trains as Regular  Timetabled Ones, Revert to Pre-Pandemic Fares

ट्रेनचे स्टेट्स कसे तपासायचे ???

Railway प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वेकडून रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट रेल्वेच्या वेबसाइटवर टाकली जाते. याशिवाय NTES App वरही त्याबाबतची माहिती उपलब्ध आहे. रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटला भेट देऊन कोणत्याही ट्रेनचे स्टेट्स तपासले जाऊ शकते.

indian railways: View: Passenger fare hike must to push Indian Railways on  reform track - The Economic Times

आधी रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट तपासण्यासाठी

http://enquiry.indianrail.gov.in/mntes/ वर जा.
यावर Exceptional Trains हा पर्याय दिसेल. ते निवडा.
रद्द, री-शेडयूल आणि डायव्हर्ट गाड्यांच्या लिस्टवर क्लिक करा.
येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

Kerala: New train takes 70 mins to cover 9 km

ट्रेन रद्द केल्यावर रिफंड मिळतो

ज्या प्रवाशांनी IRCTC वेबसाइटद्वारे ई-तिकीट बुक केले आहेत त्यांना तिकिटांच्या रिफंडसाठी काहीही करण्याची गरज नाही. Railway रद्द झाल्यास हा रिफंड ग्राहकाच्या बँक खात्यात/क्रेडिट कार्ड/ई-वॉलेटमध्ये जमा केला जाईल. जर तुम्ही रिझर्वेशन काउंटरवरून तिकीट खरेदी केले असेल तर ते कोणत्याही कॉम्युटराइज्ड रिझर्वेशन काउंटरवर ट्रेन सुटल्यानंतर 72 तासांपर्यंत रद्द केले जाऊ शकते. जर प्रवाशाने स्वतःहून तिकीट रद्द केले तर IRCTC काही कॅन्सलेशन चार्ज रिफंड मधून कापते. प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगिरीसाठी कॅन्सलेशन चार्ज वेगवेगळे आहेत.

हे पण वाचा :

इशारा !!! आता मोठ्या व्यवहारांवर Income Tax Department ठेवणार लक्ष, पकडताच बजावणार नोटीस

Investment : Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा बँकांच्या FD पेक्षा जास्त व्याज !!!

Mutual Fund द्वारे अशा प्रकारे गुंवणूक करून मिळवून भरपूर रिटर्न !!!

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये फक्त 20 रुपये भरून मिळवा अतिरिक्त 56 दिवसांची व्हॅलिडिटी !!!

Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त !!! नवीन दर पहा

Leave a Comment