भारतात कुंभमेळा मोठ्या उत्सहाने पार पडतो. यासाठी संपूर्ण देशभरातून साधू संतांसह भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात. एवढेच नाही परदेशातूनही पर्यटक हा मेळा पाहण्यासाठी येत असतात. जानेवारी २०२५ मध्ये प्रयागराज इथे कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रेल्वे विभाग देखील सज्ज झाला असून त्यासाठी 992 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
पायाभूत सुविधांसाठी 933 कोटी
प्रयागराज इथं जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सुसज्य व्यवस्था करण्यावर रेल्वे मंत्रालय काम करत असून त्यासाठी 992 विशेष गाड्या चालवण्याची योजना आहे असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. याशिवाय रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी विविध पायाभूत सुविधा उभारणीसाठी 933 कोटी रुपये राखून ठेवले आहेत.
रेल्वे रुळांचं दुहेरीकरण
12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान भाविकांची प्रचंड गर्दी हाताळण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठक घेतली जलद वाहतुकीसाठी प्रयागराज विभाग आणि लगतच्या भागात 3700 कोटी रुपये खर्चून रेल्वे रुळांचं दुहेरीकरण युद्धपातळीवर करण्यात येत आहे.
2019 मध्ये चालवल्या होत्या 694 विशेष गाड्या
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कुंभ मिळाला 30 कोटी ते 50 कोटी भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेल्वे 6580 नियमित गाड्यांच्या व्यतिरिक्त 992 विशेष गाड्या चालवणार आहे. 2019 मध्ये 24 कोटींहून अधिक लोक कुंभमेळायला उपस्थित होते आणि त्यावेळी 694 विशेष गाड्या चालवल्या होत्या त्या अनुभवाच्या आधारे विशेष गाड्यांची संख्या ही 42 टक्क्यांनी वाढ होऊन ती 992 पर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आला आहे