Railway : ट्रेनचे तिकीट हरवले तर डुप्लिकेट तिकीट कसे मिळवावे ते समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway : भारतातील वाहतुकीच्या प्रमुख साधनांपैकी रेल्वे हे एक आहे. दररोज लाखो लोकं रेल्वेतून प्रवास करतात. त्यासाठी तिकीट काढणे बंधनकारक आहे. विना तिकीट प्रवास करणे हा एक गुन्हा आहे. यासाठी तिकीट नसलेल्या प्रवाशांना मोठा दंड भरावा लागेल. अनेक वेळा प्रवाशांसोबत असेही घडते की तिकीट घेतल्यानंतर ते हरवते.

जर प्रवास करताना तिकीट हरवले तर याचा कधी विचार केला आहे का ? मात्र त्यासाठी आता फार काळजी करण्याची गरज नाही. कारण जर तिकीट हरवले तर प्रवाशांना डुप्लिकेट तिकीट देखील मिळू शकेल. मात्र इथे एक गोष्ट हे लक्षात घ्या कि, डुप्लिकेट तिकिटाचे नियम आणि शुल्क वेगवेगळ्या क्लाससाठी वेगवेगळे आहेत. प्रवाशाला त्यासाठी सर्वांत आधी चेकरला तिकीट हरवल्याची कल्पना द्यावी लागेल. डुप्लिकेट तिकीट हे तिकीट काउंटरवरून देखील घेता येईल.

भारतीय रेल्वेच्या (Railway) अधिकृत वेबसाइट, http://indianrail.gov.in वर डुप्लिकेट तिकीट कसे घ्यायचे हे सांगण्यात आले आहे. मात्र डुप्लिकेट तिकिटांसाठी थोडे पैसे द्यावे लागतील. सेकंड आणि स्लीपर क्लासचे डुप्लिकेट तिकीट 50 रुपयांमध्ये मिळेल. तर अप्पर क्लासच्या डुप्लिकेट तिकिटांसाठी 100 रुपये द्यावे लागतील. रिझर्वेशन चार्ट तयार केल्यानंतर कन्फर्म तिकीट हरवले तर भाड्याच्या 50% रक्कम द्यावी लागेल.

जर कन्फर्म झाल्यानंतर तिकीट फाटले तर एकूण भाड्याच्या 25 % रक्कम भरल्यानंतरच डुप्लिकेट तिकीट मिळेल. इथे हे लक्षात घ्या कि, वेटिंग लिस्ट असलेल्या फाटलेल्या तिकिटांसाठी रेल्वे डुप्लिकेट तिकिटे देत नाही. जर तुमचे हरवलेले मूळ तिकीट सापडले तर तुम्ही डुप्लिकेट तिकिटासाठीचे भरलेले पैसे ट्रेन सुटण्यापूर्वी दोन्ही तिकिटे रेल्वे काउंटरवर दाखवून मिळवू शकता. मात्र, त्यातून पाच टक्के रक्कम कापली जाईल. Railway

जर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट असेल आणि काही कारणास्तव तुम्हाला ट्रेनमध्ये (Railway) प्रवास करावा लागत असेल तर हे तिकीट तुमच्यासाठी खूप महत्वाचे ठरेल. यासाठी ट्रेनमध्ये असणार्‍या TTE शी संपर्क साधा. यानंतर जिथपर्यंत प्रवास करायचा आहे तिथले तिकीट घेता येईल. अशा परिस्थितीत, TTE तिकिटाच्या भाड्यासह विशिष्ट दंड आकारून तिकीट देईल.

हे पण वाचा :

Vi Prepaid Plan : फक्त 82 रुपयांमध्ये Vi युझर्सना पाहता येणार अनलिमिटेड वेबसीरीज-मुव्हीज

E-Commerce : खुशखबर !!! ‘या’ सरकारी वेबसाइटवर स्वस्त दरात खरेदीची संधी

PM Kisan : शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळण्यास होतो आहे उशीर, यामागील कारण तपासा

ट्रक आणि ट्रॉलीचा भीषण अपघात, 8 जण जागीच ठार

Business : कमी खर्चात भरपूर पैसे मिळवून देईल ‘हा’ व्यवसाय, सरकारकडूनही मिळेल मदत

Leave a Comment