मुंबईत रेल्वे रुळावरून घसरल्याने मराठवाड्यातील रेल्वेसेवा विस्कळीत, ‘या’ गाड्या रद्द 

औरंगाबाद – मध्य रेल्वेमधील दादर-पोन्डिचेरी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा फटका मराठवाड्यातील रेल्वे प्रवाश्यांना बसला आहे. नांदेड रेल्वे विभागातून मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.

रद्द करण्यात आलेली गाडी –

1. मुंबई येथून सुटणारी मुंबई सी.एस.एम.टी. ते हुजूर साहिब नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली आहे.

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या –

1. मुंबई येथून दिनांक 16.04.2022 रोजी सुटणारी मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस मुंबई ते मनमाड दरम्यान अशातः रद्द करण्यात आली असून ही गाडी मुंबई ऐवजी मनमाड येथून सुटेल, मनमाड ते जालना अशी धावेल.