Saturday, March 25, 2023

‘या’ दिवशी होणार रेल्वे तिकीट बुकिंगला सुरुवात

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभुमीवर बंद करण्यात आलेल्या रेल्वेच्या बुकिंगला १५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आयआरसीटीसी अँप आणि वेबसाईटवर १५ एप्रिलपासून प्रवासाची तिकिटं उपलब्ध असणार आहेत. करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी २४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला.

लॉकडाउनच्या कालावधीत करोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन संपूर्ण देशात भारतीय रेल्वेने आपली प्रवासी सेवा बंद केली आहे. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात होणार आहे. राजस्थान पत्रिका या वृत्तपत्राने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

- Advertisement -

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”