हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UAE गुरुवारी संयुक्त अरब अमिराती आणि कतारमध्ये मुसळधार पाऊस पडला. ज्यामुळे सर्व रस्ते पाण्याने भरल्याचे पहायला मिळाले. या आलेल्या पावसामुळे यूएईच्या पूर्वेकडील भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे घरांचे नुकसान झाले आणि अनेक वाहने देखील वाहून गेली. त्यामुळे अनेकांना हॉटेल्सचा आसरा घ्यावा लागला.
खलीज टाइम्समधील बातमीनुसार, अचानक बदललेल्या या हवामानामुळे संयुक्त अरब अमिरातीच्या हवामान विभागाने ‘डेंजरस वेदर इव्हेंट्स’साठी रेड अलर्ट जारी केला आहे. यानंतर सोशल मीडियावर या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात आहेत. यामध्ये पावसानंतर रस्त्यावर जमा झालेल्या पाण्यात अनेक वाहने तरंगताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये बचाव कर्मचारी पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना वाचवताना दिसत आहेत. UAE
अल अरबिया इंग्लिशने सांगितले की,” UAE चे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण 20 हून जास्त हॉटेल्सच्या संपर्कात आहे. जिथे पुरामुळे विस्थापित झालेली 1,885 पेक्षा जास्त लोकं राहू शकतील. UAE च्या हवामान खात्याने म्हटले की,” अचानक आलेल्या या पावसाने देशातील गेल्या 27 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. ”
कतारमधील परिस्थितीही काहीशी UAE सारखीच आहे. या मुसळधार पावसामुळे राजधानी दोहामधील अनेक रस्ते पाण्यात बुडाले आहेत. मिडल ईस्ट आयच्या बातमी नुसार, गुरुवारी झालेल्या पावसामुळे विश्वचषक आयोजित केल्या जाणाऱ्या ठिकाणाजवळील रस्ते आणि वाहने पाण्याखाली गेली होती.
अल जझीराने सांगितले की,” वादळ आणि पाऊस गुरुवारी लवकर सुरू झाला. जो या आठवड्याच्या अखेरीसपर्यंत सुरू राहू शकेल.” येथी हवामान विभागाच्या माहितीनुसार, दोहामध्ये सुमारे 38 मिमी पावसाची नोंद झाली आहे. एका रिपोर्ट्सनुसार, दोहामध्ये जुलै महिन्यात पाऊस सामान्य नाही.
साधारणपणे येथील उन्हाळा हा कोरडा आणि अत्यंत उष्ण असतो. भारतातही राजस्थानसारख्या वाळवंटी भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक शहरे पाण्यात बुडाली असून अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाळवंटात पडणारा पाऊस आणि युरोपीय देश आणि ब्रिटनमध्ये होणारी आग ही हवामान बदलाची सर्वात घातक उदाहरणे आहेत. काही दिवसांपूर्वीच, इंग्लंड या सर्वात थंड देशामध्ये इतिहासातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली. यावेळी तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा आकडा पार केला होता. दक्षिण-पश्चिम लंडनमधील हिथ्रो येथे 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हे पण वाचा :
Car Loan : सेकंड हँड कार घेण्यासाठी अशाप्रकारे स्वस्त दरात मिळवा कर्ज !!!
DBS Bank कडून ग्राहकांना मोठी भेट !!! FD वरील व्याजदरात केली पुन्हा वाढ
Moto G62 5G : 5000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा; Motorola च्या स्मार्टफोनची जोरदार चर्चा
Business Ideas : ‘या’ झाडांच्या लागवडीद्वारे मिळवा करोडो रुपये !!!
George Floyd च्या हत्येप्रकरणी आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली शिक्षा !!!