महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा कहर : चतुरबेटचा पुल गेला वाहुन तर पारच्या शिवकालीन पुलाचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाचगणी प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यात सध्या पावसाचा कहर वाढला असुन कादाटी खोऱ्यातील चतुरबेट पुल वाहुन गेल्यामुळे या भागात राहणाऱ्या ग्रामस्थांचा संपर्क चारही बाजुने तुटला आहे. परिणामी ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे मदतीची याचना केली जात आहे. पावसाचा कहर वाढला असल्यामुळे प्रशासनाला मदत कार्य पोहचविण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

महाबळेश्वर तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पावसापैकी २३ इंच पावसाची नोंद एका दिवसात झाली आहे. पावसाचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे महाबळेश्वर तालुक्याला जोडणारा फक्त पसरणी घाट सुरु असून केळघर घाट, आंबेनळी घाट पुर्णता दरड कोसळल्यामुळे बंद आहे. मेटतळे येथील पुल वाहुन गेल्यामुळे महाबळेश्वरही संपर्कहीन झाले आहे.

कांदाटी खोऱ्यातील चतुरबेट पुल वाहुन गेल्यामुळे गावाचा संपर्क शेजारील गावांशी देखील संपर्क सुटला आहे. ओढे नाल्यावरील छोटे पुल कोसळले असुन पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे रस्ते दुभागले आहेत. चतुरबेट येथे दरड कोळून दोन घराचे नुकसान झाले असून जनावरांच्या गोठयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र, पावसाचा कहर पाहता दरड कोसळण्याची शक्यता वाढली असल्यामुळे गावातील कुटुंबानी गावातील मंदिरात आश्रय घेतला आहे. चतुरबेट सपर्कहीन झाल्यामुळे प्रशासनाकडे मदतीची धाव ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, कांदाटी खोऱ्यातील पावसामुळे संपर्क होत नसल्यामुळे प्रशासनाची हतबलता समोर आली आहे.

प्रतागडाच्या पायथ्याशी पार या गावी असलेल्या शिवकालीन पुलावरुन रात्रभर पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे शिवकालीन पुलावरुन पाणी गेले आहे. परिणामी पुलाचे रेलिंग तुटले असून पुलावरुन पाणी गेल्यामुळे संपर्क तुटला आहे. महाबळेश्वर तालुक्यात सध्या स्थिती गंभीर झाली असुन ठिकठिकाणी संपर्क तुटल्यामुळे प्रशासकीय मदत मिळायला अडथळा येत आहे.

Leave a Comment