‘जय श्रीराम’चा नारा देत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली सार्वजनिक शौचालयाची तोडफोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ । एका मंदिराजवळ शौचालय असल्याचं सांगत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका सार्वजनिक शौचालयाची तोडफोड केलीय. उल्लेखनीय म्हणजे, इथे अनेक लोक गेल्या ४० वर्षांपासून या शौचालयाचा वापर करत होते. मात्र, हे शौचालय मंदिराजवळ असल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आम्ही पाडलं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

सविस्तर माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ची घोषणाबाजी करत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. शौचालय मंदिराच्या भिंतीजवळ असल्याचं म्हणत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या शौचालयाची तोडफोड केली. परंतु, जवळपास गेल्या ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं हे शौचालय मंदिराच्या भिंतीपासून काही फुटांच्या अंतरावर आहे. तसंच मंदिर आणि शौचालयादरम्यान एक छोटी गल्लीही आहे.या मंदिराच्या आणि शौचालयाच्या जवळच बस स्टॉप असल्यानं अनेक प्रवासी या शौचालयाचा वापर करत होते. तसंच नुकतंच, या शौचालयाचं आधुनिकीकरण करत कामही करण्यात आलं होतं.

बुधवारी दुपारी जवळपास ११.३० वाजता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’, ‘एक ही नारा एक ही नाम – जय श्रीराम जय श्रीराम’ अशा घोषणा देत हातोड्यांनी टॉयलेट कॉम्प्लेक्सवर घाव घातले आणि या शौचालयाची तोडफोड केली. यामध्ये महिला आणि दिव्यांगासाठी बनवण्यात आलेल्या शौचालयाचाही समावेश होता.अखिल भारत हिंदू महासभेचे पश्चिम उत्तर प्रदेश अध्यक्ष असल्याचं सांगत विष सिंह कंबोज यांनी या शौचालयावरील हल्ल्यांचं नेतृत्व केलं. ‘दोन दिवसांपूर्वी आमचे हिंदू योद्धे इथे आले होते. त्यांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. परंतु, इथे कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे आम्हीच हे शौचालय नष्ट करण्याचा विडा उचलला’ असं कंबोज यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं.

दुसरीकडे, या शौचालयात साफसफाई सुपरवाजयर म्हणून काम करणाऱ्या विमला यांनी मात्र हे शौचालय ४० वर्ष जुनं असल्याचं म्हटलंय. मंदिर आणि शौचालयात अंतरावर बनलेलं आहे. मंदिर आणि टॉयलेट दरम्यान एक छोटा नालाही आहे. आम्ही त्यांना शौचालयाची नासधूस करण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. या शौचालयाचा अनेक पुरुष, महिला, दिव्यांग वापर करतात, आता ते कुठे जाणार? असा प्रश्नही विमला यांनी विचारला. शौचालयाची नासधूस करणाऱ्या लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असं प्रशासनानं म्हटलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment