अटक होण्याआधी राज कुंद्राने डिलीट केला 2 टीबी डेटा, एडल्‍ट कंटेंटसाठी दररोज तयार करण्याचा नवीन What’s App Group

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा सध्या पॉर्न चित्रपटांशी संबंधित एका प्रकरणात अडकल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात आहे. पॉर्न चित्रपट बनवण्यासाठी आणि काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून रिलीज केल्याप्रकरणी राजला मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. या प्रकरणात सतत नवीन खुलासे समोर येत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा हॉटशॉट अ‍ॅपवर पॉर्न चित्रपट बनवण्यासाठी दररोज एक नवीन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करत होता. दुसरीकडे, राज कुंद्रा अगदी संभाळून या व्यवसायात पाऊल ठेवत होता. राजला हे ठाऊक होते की,” गुन्हे शाखा त्याच्यावर केव्हाही छापे टाकू शकते आणि म्हणूनच त्याच्या IT टीमने 2 टीबी डेटा डिलीट केला.”

राज कुंद्राकडून हॉटशॉट अ‍ॅपच्या शूटसाठी दररोज नवीन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले जात होते. ज्या दिवशी शूटिंग होत असे त्या दिवसाचे नाव या ग्रुपल देण्यात आले. त्याचबरोबर मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशीत आणखी काही महत्त्वाची माहितीही समोर आली आहे. याच प्रकरणात फेब्रुवारीमध्ये FIR नोंदविण्यात आला होता आणि गेहना वशिष्ठसह काही आरोपींना अटकही करण्यात आली होती. त्यावेळी राज कुंद्राने त्याच्या व्हियान ऑफिसमध्ये असलेल्या सर्व्हरवरून सुमारे 2 टीबी डेटा डिलीट केला होता. राज कुंद्राच्या सांगण्यावरून त्याच्या IT टीमने हा डेटा डिलीट केला कारण कुंद्राला समजले होत्व की, कोणत्याही वेळी गुन्हे शाखा त्याच्यापर्यंत पोहोचू शकते.

वास्तविक हा तोच सर्व्हर आहे ज्याद्वारे लंडनमधील केरेनिन कंपनीला हा पॉर्न व्हिडिओ फायनल झाल्यावर पाठविण्यात आला होता आणि बुधवारी संध्याकाळी केलेल्या छाप्या दरम्यान गुन्हे शाखेने त्यावर शिक्कामोर्तब केले. सर्व्हरवरून डिलीट केला गेलेला डेटा रिकव्हर करण्यासाठी क्राइम ब्रँचने तो FSL कडे पाठविला आहे, जेणेकरून या सर्व्हरवरून लंडनला आतापर्यंत किती व्हिडिओ पाठवले गेले आहेत हे समजू शकेल. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, त्यांनी आतापर्यंत चौकशीत 100 हून अधिक पॉर्न व्हिडिओ जप्त केले आहेत.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांचा हवाला देत असा दावा केला जात आहे की,” मुंबई पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडले आहेत. या पुराव्यांनुसार पॉर्नचा व्यवसाय बॉलिवूडइतका मोठा व्हावा अशी राजची इच्छा होती. एवढेच नव्हे तर राजने ‘लाइव्ह सेक्‍शुअल एक्ट’ ला या व्यवसायाचे भविष्य मानले. मुंबईचे सह पोलिस आयुक्त मिलिंद भ्रांबे म्हणाले की,”राजच्या ‘हॉटशॉट’सह अशा सर्व साइट Apple आणि Google प्लेस्टोअरमधून काढून टाकले गेले आहेत.”

राज कुंद्राचे म्हणणे आहे की,” त्याने 2019 मध्येच त्याची कंपनी विकली आहे. राज कुंद्राच्या खटल्याबद्दल बोलताना कोर्टात राजविरोधात पुरावे सादर करताना प्रॉपर्टी सेलने सांगितले की, व्हियान नावाच्या कंपनीत प्रॉपर्टी सेलला बरेच परकीय चलन मिळाले आहे. राज कुंद्राचा फोन हस्तगत करण्यात आला असून त्याची तपासणी करण्याची गरज आहे. त्या आधारे पोलिसांनी कोर्टाकडे राजसाठी रिमांड मागितला आणि कोर्टाने राज कुंद्राला 23 जुलै पर्यंत रिमांडवर पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज कुंद्रा याच्याविरोधात फेब्रुवारी 2021 मध्ये पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्यावर पॉर्न व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपासणीत दोषी आढळल्यानंतर पोलिसांनी आज राज कुंद्राला अटक केली.

Leave a Comment