संतापजनक ! स्वयंघोषित भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिल्लोर भागातील एका आश्रमातील बाबाचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा भोंदू बाबा अल्पवयीन मुलीसह आश्रमाच्या आत अश्लिल कृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या भोंदुबाबाच्या पत्नीने व्हिडीओमध्ये दाखविला जाणारा बाब तिचा पती आहे. तो फिल्लोर गावातील एका धार्मिक आश्रमाचा प्रमुख आहे असे सांगितले. तसेच या भोंदुबाबाच्या पत्नीने आपल्या पती म्हणजेच भोंदुबाबाच्या विरोधात लिखित तक्रार केली आहे.

यामध्ये तिने पतीचं दुष्कृत्यासह त्याने तिच्यासोबत केलेल्या अमानवीय व्यवहाराबद्दलही उल्लेख केला आहे. याशिवाय तिने पतीविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये हा भोंदू बाबा ज्या अल्पवयीन मुलीसोबत दिसत आहे तिनेदेखील या बाबाच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय गावाचे पंचायत सदस्य आणि ज्येष्ठांनीही बाबांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या बाबाने आपल्यावर करण्यात आलेले सगळे आरोप चुकीचे असल्याचे सांगितले.

यानंतर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांनाही बोलवण्यात आलं आहे. त्यांच्या जबाबानंतर आरोपीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे या तपासाच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.