Rajendra Hagawane and Sushil Hagawane Arrested : जेवणावर ताव, CCTV फुटेज आलं आणि पोलिसांनी रचला सापळा; राजेंद्र हगवणेच्या अटकेचा थरार

Rajendra Hagawane and Sushil Hagawane Arrested
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rajendra Hagawane and Sushil Hagawane Arrested । वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. मागच्या ७ दिवसापासून दोघेही फरार होते. या प्रकरणात वैष्णवीचा पती शंशाक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना यापूर्वीच अटक झाली होती. आता वैष्णवीचा सासराही पोलिसांच्या ताब्यात आला आहे. अटकेच्या आधी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी एका हॉटेलवर जेवणाचा ताव मारला. त्यांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. त्यानंतर अचूक सापळा रचत पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे याना ताब्यात घेतलं.

पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली– Rajendra Hagawane and Sushil Hagawane Arrested

गुरुवारी मावळ तालुक्यातील तळेगाव येथे एका हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये ते दिसले. राजेंद्र हगवणे मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत होते. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरुन सुशील निघून गेला. पोलिसांना ही माहिती समजाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली. संपूर्ण परिसरात झडती घेतली. अखेर शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामध्ये वैष्णवीची सासू, नवरा आणि नणंद आधीपासूनच अटकेत आहे. या तिघांनाही पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर आता वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दिरालाही अटक करण्यात आली आहे. Rajendra Hagawane and Sushil Hagawane Arrested

दरम्यान, लग्नात 51 तोळं सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर कार देउऊनही समाधान झालेल्या, सुनेचा हु्ंड्यासाठी छळ करणाऱ्या पुण्यातील मुळशी येथील हगवणे कुटुंबाच्या क्रूर कृत्यांची माहिती आत्तापर्यंत सर्वत्र पोहोचली आहेच. सासरच्या जाचाला कंटाळूनच वैष्णवीने आत्महत्येचं पाऊल उचलले. या संपूर्ण प्रकरणाने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीच्या सासरे-दीरांना अटक झाल्याची बातमी समजल्यानंतर तिचे आई-वडील, कस्पटे कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले. वैष्णवीच्या सासरच्या लोकांवर मकोका लावून त्यांना कठोरात शिक्षा व्हावी अशी मागणी कस्पटे कुटुंबाने केली असून तरच आपल्या गेलेल्या मुलीला न्याय मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.